Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळेची वेळ पूर्ववत करा

ग्रामपंचायतने ठराव घेऊन दिले निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 चालू शैक्षणिक सत्रात सुरुवातीलाच शासनाने एक आदेश निर्गमित करून दुपारच्या सत्रामध्ये असलेल्या शाळा च्या वेळेत बदल करून सकाळच्या सत्र मध्ये शाळा भरवण्याचे अधिसूचना केली त्याला तालुक्यातील तुळजापूर येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून शालेय शिक्षण समिती तसेच ग्रामपंचायत ने ठराव घेऊन शाळेची वेळ पुर्व वत करावी यासाठी गट विकास अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिनांक 20 ऑगस्ट रोजी सादर केले आहे.

 सविस्तर वृत्त असे की

 महाराष्ट्र शासनाने चालूशैक्षणिक वर्षापासून शाळेच्या दैनंदिन वेळेत बदल केला असून पूर्वी शाळा सकाळी साडे दहा ते पाच या वेळेत भरविण्यात येत होती त्यामध्ये शासनाने आदेश निर्गमित करून त्यामध्ये बदल केला नवीन आदेशाप्रमाणे सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत शाळा भरवण्यात यावी

असे आदेशित केले परंतु याला ग्राम पातळीवर तीव्र विरोध होत असून पूर्वीची वेळ कायम ठेवावी अशी ग्रामीण भागातून मागणी होत आहे याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील तुळजापूर येथील ग्रामस्थांनी तसेच शालेय शिक्षण समितीने ठराव घेऊन शाळेची वेळ पूर्व वत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तसेच ठरावाद्वारे गट विकास अधिकारी यांच्या मार्फत शासनाला केली आहे निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे सकाळची ज्यावेळेस शाळा असायची सकाळी साडे दहा ते पाच या वेळेत भरवण्यात येत होती त्यामध्ये बदल करण्यात आला असून सकाळी नऊ ते एक अशी वेळ शासनाकडून करण्यात आली आहे ग्राम पातळीवरील शंभर टक्के विद्यार्थी हे शेतकरी व शेतमजूर यांचीच आहे या वेळेत पालकांना शेतात अथवा मजुरीसाठी जावे लागते दुपारी एक वाजता शाळा सुटल्यानंतर आमची मुले हे वारसपणे गावात किंवा नदी नाल्याने विणतात त्यामुळे त्यांच्या जीवितवास धोका निर्माण होऊ शकतो या वेळेत आम्ही आमच्या मुलांना शाळेत न पाठवता आमच्या सोबत नेल्यास मुलांचे शैक्षणिक नुकसान होते आमच्या मुलांचे कोणतेही जीवित हानी अथवा शैक्षणिक नुकसान झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही शाळेची व संबंधित अधिकारी यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे नाही केली तर आम्ही पालक आईला दास्ताने त्यावर बहिष्कार टाकावा लागेल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केलेले आहे निवेदनावर शालेय शिक्षण समितीचे पंडित म्हस्के, सुनिता कांबळे, लक्ष्मण कोल्हे, प्रमोद तिडके, गजानन कोल्हे, रामेश्वर तिडके, रघुनाथ तिडके जानकीराम तिडके, श्याम जाधव, भास्करराव कोल्हे, दत्तू कोल्हे, ज्योती मगर, उषा मगर, परमेश्वर बोरुडे, रंजन खरात, गोपीचंद कोल्हे,परमेश्वर कोल्हे, कैलास कोल्हे, कृष्णा खरात आदींसह बहुतांश ग्रामस्थ तसेच पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, आदींना दिल्या आहेत

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये