Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पूर्वसंमतीशिवाय शेतीचे खोदकाम करून नुकसान केले 

67 वर्षीय महिलेचे उपविभागीय मृद संधारण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

  मालकाची कोणतीही परवानगी न घेता मृद व जलसंधारण कार्यालयाने शेतामध्ये सिमेंट नाला बांधकाम केले. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्याचा कसलाही त्याचा कसलाही मोबदला संबंधित कार्यालयाने दिला नाही वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांचा मागणीकडे उपरोक्त कार्यालयाने केराची टोपली दाखवली. कसलाही पर्याय नसल्याने सदर शेत मालक 67 वर्षीय महिलेने उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालयासमोर 20 ऑगस्ट पासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.

 सविस्तर वृत्त असे की निवेदनकर्त्या महिला नामे विमल विनायक वायाळ राहणार मनुबाई तालुका चिखली यांची मौजे खडका तालुका देऊळगाव राजा येथे गट नंबर दोन मध्ये तीन हेक्टर 46 आर जमीन आहे उपविभागीय मृदा व जलसंधारण अधिकारी कार्यालय यांनी त्यांच्या शेतामध्ये त्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या शेतामध्ये 25 फूट रुंद व पन्नास फूट नाला एवढे सिमेंट नाल्याचे बांधकाम केले त्याचे एकूण क्षेत्रफळ 750 फूट अंदाजे होत आहे त्यांच्या शेतामध्ये 300 ते 400 फूट नाला खोदला त्यामध्ये त्यांची वडीलोपार्जित असलेले पाच जांभूळ चे झाडे होते त्याची सुद्धा विल्हेवाट संबंधित कार्यालयाने लावली त्यांच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे त्या आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये गेल्या नाही सदर जमिनीमध्ये असलेल्या जांभळीच्या झाडापासून त्यांना वार्षिक एक ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता परंतु कोणतीही पूर्व संमती न घेता तसेच त्यामध्ये असलेल्या झाडाचे विल्हेवाट संबंधित कार्यालयाने लावली या संदर्भात त्यांनी जलसंधारण कार्यालय विचारणा केली असता झाडे तोडण्या अगोदर व माझ्या शेतामध्ये सिमेंट नाना बांधण्या अगोदर माझी पूर्वसंमती का घेतली नाही याचे विचारणा केली असता संबंधित कार्यालयाने उत्तर देणे टाळले तोडलेले पाच जांभळीचे झाडे तरी माझ्या ताब्यात द्या अशी विनंती संबंधित अधिकाऱ्यांना ती सुद्धा कार्यालयाने फेटाळली सदर उपोषण कर्त्या महिलेने आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला परंतु अद्याप पर्यंत त्याची दखल घेतली नसल्यामुळे नाईलाजाने 67 वर्षीय महिलेने 20 ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय मृदा व जलसंधारण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे

 आज विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्या महिलेचे म्हणणे ऐकून उपविभागीय अधिकारी मृद व जलसंधारण यांना तोडगा काढण्यास सुचविले परंतु त्यावर

 सदर अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारवाई केली नाही

 उपोषण मंडपात भेट देणाऱ्या मध्ये भाजपाचे युवा नेते सुनील कायंदे, एकनाथ काकड, राष्ट्रवादीचे राजेश इंगळे आदींनी भेटी दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये