ताज्या घडामोडी

वायगाव (हळद्या) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त स्मशान भूमी येथे वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

१५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वायगाव येथील स्मशानभूमीत पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
आज संपूर्ण जगात सर्व सजीवांना जिवंत ठेवणारा प्राणवायू म्हणजे “ऑक्सिजन” हा ऑक्सिजन कोणत्या फॅक्टरी मध्ये तयार होत नाही तर हा ऑक्सिजन विनामूल्य, मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणारी एकमेव मशीन, ते म्हणजे ” lझाड” मग तरीही आपण इतरांसाठी नको किमान आपल्या साठी, आपल्या कुटुंबाला मुबलक ऑक्सिजन मिळावा यासाठी, कोविड सारख्या महामारी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपल्याच बांधवांना प्राण गमवावे लागू नये यासाठी का झाडे लावत नाही..! यावर आज आत्ताच जाणीवपूर्वक विचार करणे आणि प्रत्यक्षात पर्यावरण संरक्षण साठी एकत्रित येऊन कार्य करणे अत्यावश्यक आहे,अन्यथा आपल्या पृथ्वी मातेचा, परिणामी आपला, प्रत्येक सजीवाचा विनाश अटळ आहे..!

स्मशानभूमीतील वृक्षारोपण हा समितीचा महत्वकांक्षी उपक्रम असून समितीचे पदाधिकारी जिल्हयात हा उपक्रम राबवीत आहे.

यावेळी समुदरपुर तालुकाध्यक्ष नमिता पाठक, समिक्षा मांडवकर, प्रिती वासानिक, सुषमा जामुनकर,लतिका डगवार,वर्षा गोडबोले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये