अभय जाधव, संजय मुंदणकर, पंढरीनाथ खरात, व सौ वैशाली सोरटी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी प्रा. अशोक दोहींफोडे
देऊळगाव राजा :- राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी न्याय फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2026 चे वितरण 2 ऑगस्ट रोजी धुळे येथे एका समारंभात करण्यात आले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निमगाव गुरु येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक अभय जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळखेड येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक संजय मुंदनकर , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सेनगाव येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक पंढरीनाथ खरात व गुजराती पाठशाळा, छत्रपती संभाजी नगर येथील मुख्याध्यापीका सौ वैशाली सोरटी यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पुरस्कार प्राप्त सर्व मुख्याध्यापक चे अभिनंदन डॉ शंकरराव तलबे , संतोष सिनगारे , शेख निजाम, नितीन अहिरे, गजानन डोईफोडे, गजानन निकम, जगदीश आढाव, सुनील अहिरे, गजानन तिडके, श्रीमती विमल गाडेकर यांनी केले आहे, व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या,



