गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समुद्रपूर पोलीसांनी आरोपीचे राहते घरी दारूबंदीबाबत केली प्रो.रेड

एकूण किंमत 80,700 रू चा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     सदर गुन्ह्याची हकिकत याप्रमाणे आहे कि, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून पो.स्टे. समुद्रपूर स.पो.नि. एस.बी. शेगांवकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही पो.स्टाफ पो.हवा./261 अरविंद येनुरकर, पो.ना./1245 रवि पुरोहित, पो.ना./299 राजेश शेंडे, पो.शि./1626 वैभव चरडे, चा.पो.ना./336 सचिन वाघमारे व दोन पंचासह यातील सूरज रविंद्र वानखेडे, वय 26 वर्ष, रा. निंभा, तह. समुद्रपुर राहते घरी मौजा निंभा येथे दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, आरोपीचे घरझडती दरम्यान स्वयंपाक रूममध्ये गॅसओट्याखाली व फ्रिजमध्ये देशी विदेशी दारूचा माल बिना पास परवाना मिळून आल्याने, जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातून  जु.किं. 80,700 रू. चा मुद्देमाल जप्त करून, पो.स्टे. परतीनंतर आरोपीविरूध्द नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्ह्यातील आरोपीस रितसर अटक करण्यात आली असून, त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर करून आरोपीचा पि.सी.आर. प्राप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येते.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. रोशन पंडित सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार स.पो.नि. मा. श्री. एस.बी. शेगांवकर सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.शि. वैभव चरडे, चा.पो.शि. सचिन वाघमारे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये