ताज्या घडामोडी

भिषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू दोन गंभीर – दुचाकीचा चेंदामेंदा दोन दुचाकींना धडक देणारे वाहन पोलिसांनी पकडले

पती पत्नी सह मुलगी जागीच गतप्राण - उखडलेल्या रस्त्याने उध्वस्त केले कुटुंब

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा सास्ती मार्गावरील धोपटाळा गावालगत असलेल्या जव्हेरी पेट्रोल पंप समोर कोळशाच्या ट्रक ने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत पती पत्नी सह मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राप्त माहितीनुसार सास्ती मार्गे धोपटाळा कडे वैद्य कुटुंब दुचाकीने जात होते. दरम्यान समोरून कोळसा भरून येणाऱ्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरून जाणारे वैद्य कुटुंब जागीच ठार झाले. ठार झालेले निलेश वैद्य राजुरा येथील बळीराजा सोसायटी मधे कार्यरत होते.

त्याच ट्रक ने लगेच दुसऱ्या दुचाकीला देखिल धडक दिल्याची चर्चा असुन त्या दुचाकीवरील दोन व्यक्ती अत्यवस्थ असुन त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

सदर अपघात फुटलेल्या रस्त्यांमुळे झाला असल्याचीही चर्चा आहे. राजुरा सास्ती मार्गावर धोपटाळा गावाजवळ रस्ता पुर्णपणे फुटला असुन ह्या मार्गावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. फुटलेल्या मार्गामुळे अवजड वाहन जाताच धुळीचे लोट उडत असल्याने दुचाकीस्वारांना समोरचे काहीही दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते मात्र प्रशासनाने ह्याकडे कायम दुर्लक्ष केल्याने अखेरीस एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतातरी निद्रिस्त प्रशासन जागे होऊन रस्ता दुरुस्त करणार की अजुन बळी जाण्याची वाट बघणार असा संतप्त प्रश्न धोपटाळा वासियायांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये