त्र्यंबकेश्र्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाने केला तीव्र निषेध
तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये शनिवारी (दि. 20) एक धक्कादायक प्रकार घडला असून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना ज्यात झी 24 तासचे प्रतिनिधी योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने तसेच इतर दोन पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केली आहे.
या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गाड्यांच्या प्रवेशाची बेकायदेशीर पावती घेणाऱ्यांकडून सदर मारहाण झाली आहे. सदर घटनेचा देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ ने तीव्र शब्दांत निषेध करीत गुंडांविरोधात विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी, आज सोमवार, 22 सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ चे अध्यक्ष गजानन तिडके, सचिव सूरज गुप्ता, कार्याध्यक्ष गणेश डोके, कोषाध्यक्ष प्रा अशोक डोईफोडे, प्रा विनायक कुळकर्णी, संतोष जाधव, कदीर शेख, मुबारक शहा, मुन्ना ठाकूर, उषा डोंगरे, किरण वाघ, परमेश्वर खांडेभराड, शिवाजी वाघ, राजेश खांडेभराड, भिमराव चाटे, अशोक जोशी, प्रभाकर मान्टे, राजेश पंडित, उपस्थित होते.