Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे मानोलीत जागतिक पर्यावरण दिवस साजरा

चांदा ब्लास्ट

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे सभोतालील गांवात नवनवीन उपक्रम राबवत आहे.

आज जागतिक पर्यावरण दिवस याचे औचित्य साधून मानोली या गांवात जिल्हा परिषद शाळा मानोली याच्या साहाय्याने जागतिक पर्यावरण दिवस साजरा केलात. यात एकूण ३० विद्यार्थ्यानी जागतिक पर्यावरण दिवस या चित्रकला स्पर्धेत सहभाग घेत पर्यावरणाला सुरक्षित करण्याचे सुंदर चित्र काढले गेले होते तसेच सर्व विदयार्थ्यांकडून वेगवेगळी झाडांची रोपटे लावण्यात आली तर पर्यावरणाचे महत्व सांगत मुलांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

     या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद पवार, वनपाल सोयाम, शंकर रामटेके व गांवातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम घेऊन माणिकगढ ने मुलांना पर्यावरणा बाबत व वृक्षारोपणा बाबत आवड निर्माण केली असे शाळेतील शिक्षकांनी प्रतिपादन केलेत. सर्व विद्यार्थी,शिक्षक व गावातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल माणिकगडच्या सी.एस.आर. चे आभार व्यक्त केलेत.

या उपक्रमाला माणिकगढ च्या सी.एस.आर.टीम ने यशस्वी करण्यास अथक प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये