Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतिभा धानोरकर यांची विजय सभा ; माझा विजय जनतेला समर्पित- खा. धानोरकर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जुन २०२४ रोजी जाहिर झाला. या निवडणूकीत कॉग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी तब्बल २ लाख ६० हजार ४०६ मतांनी विजय प्राप्त केला. त्यानंतर चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे विजय सभेत बोलतांना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझा विजय हा जनतेला समर्पित आहे.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडी, महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपूर शहरात वरोरा नाका चौकातून गांधी चौकापर्यंत विजय मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या मिरवणूकीचा समारोप गांधी चौकातील मनपा च्या मैदानात सभेने झाला. चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकातील सभेत नवनियुक्त खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार प्रसंगी प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, माझा विजय हा दिवंगत लोकनेते माजी खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना समर्पित असून त्या सोबतच माझा विजय हा एकटीचा नसुन हा विजय महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते त्या सोबतचे काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा आहे.

या विजयाचे खरे शिल्पकार माझ्या लोकसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महीला व तरुण असून हा माझा विजय मी जनसामान्यांना समर्पित करीत आहे. यावेळी मंचावर असलेल्या आमदार सुभाष धोटे व आमदार सुधाकर अडबाले यांनी देखील मनोगत व्यक्त केले. जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची भावना देखील प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. यावेळी मंचावर शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, आम आदमी पार्टी चे मयुर राईंचवार, मराठा सेवा संघाचे दिलीप चौधरी, सी.पी.एम नेते अरुण भेलके, प्रकाश रेड्डी सी.पी.आय. नेते, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, बाळु खोब्रागडे, चंदाताई वैरागडे, नम्रता ठेमस्कर, संगीता अमृतकर, अभिलाषा गावतूरे, सोहेल रजा शेख, अरुण धोटे, अनिल धानोरकर, घनश्याम मुलचंदानी, दिनेश चोखारे तसेच महाविकास आघाडी व इंडिया आघाडी चे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये