हरविलेले दोन अल्पवयीन मुले १३ वर्ष व १० वर्ष वयाची मुले दोन आर्वी पोलीसांनी शोधुन दोन तासाच्या आत दिले फिर्यादी यांचे ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
फिर्यादी नामे मिना किसन करपाते वय ३५ वर्ष धंदा शेतमजुरी रा. दत्तवार्ड आर्वी यांनी पोलीस स्टेशन आर्वी येथे येवुन रिपोर्ट दिला कि, त्या आज दिनांक १३/११/२०२६ रोजी सकाळी ०६/०० वाजता सुमारास त्यांचे पतीसह शेतमजुरीचे कामाला त्यांचे दोन्ही मुले नामे वंश किसन करपाते वय १३ वर्ष व लहान मुलगा मयुर किसन करपाते वय १० वर्ष यांना घरी ठेवुन कामाला गेल्या होत्या दुपारी ०३/०० वाजता सुमारास त्या त्यांचे पतिसह घरी आल्या असता त्यांना त्यांचे दोन्ही मुले दिसली नाही. त्यांनी घरोचे समोर राहणार शेजारी महिला शोभा ठाकरे यांना विचारले असता त्यांनी १२/०० वाजताचे सुमारास दोन्ही मुले घरी दिसली त्यानंतर दिसली नाही असे सांगीतले. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती यांनी दोन्ही मुलाचा आर्वी शहर परिसरात शोध घेतला असता मुले मिळुन आले नाही त्यामुळे त्या त्यांचे पतिसह पोलीस स्टेशन आर्वी येथे आल्या व मुले न सांगता धरून गेली आहेत शोध घेतला पण मिळुन आले नाही अशा फिर्यादी यांचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन आर्वी येथे अपराध क्रमांक ८८०/२०२६ कलम १३७ (२) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरचे दोन्ही अल्पवयीन मुलांचा शोध घेण्याकरिता मा. वरिष्ठाचे आदेशाने लगेच शोध पथक तयार करून दोन्ही अल्पवयीन मुलांचा शोध घेतला असता दोन तासाच्या आत ते तिवसा येथे असल्याचे माहीती मिळल्याने सदरचे दोन्ही अल्पवयीन मुले सपोनि / मल्हारी ताळीकोटे, पोउपनि राठोड, पोउपनि सैरिसे, नापोशि सुरेंद्र कांदे, पोशि मनोज आसोले व फिर्यादी आणि त्यांचे पति यांचेसह तिवसा येथुन जावुन ताब्यात घेतले.
सदरचे अल्पवयीन मुलाचा शोध घेण्याची कार्यवाही, मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल महाडिक यांचे निर्देशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश राठोड, पवन सैरिसे, नायक पोलीस शिपाई सुरेंद्र कांदे, पोलीस शिपाई मनोज असोले, पोलीस शिपाई बालाजी मस्के पोलीस स्टेशन आर्वी यांनी केली आहे.



