ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात जनसंवाद व सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत कानगाव व तळेगाव येथे नवीन बिट कार्यालयांचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

नागरिकांपर्यंत पोलीस प्रशासन अधिक सहजतेने पोहोचवावे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करावी, या उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष पुढाकाराने अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत ग्रामीण भागात पोलीस यंत्रणेचा विस्तार करण्यात आला आहे, याच उपक्रमांतर्गत कानगाव आणि तळेगाव येथे नवीन बिट चौकी स्थापन करण्यात आली असून, या दोन्ही बिट कार्यालयांचा नुकताच प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत प्राथमिक स्वरूपात शुभारंभ करण्यात आला आहे.

कानगाव बिट कार्यालयाचा शुभारंभ (दि. १२ नोव्हेंबर २०२६):

अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कानगाव बिट करीता हिंगणघाटचे मा. तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या विशेष सहकार्याने महसूल विभागाची बंदिस्त इमारत बिट चौकीकरिता उपलब्ध करून घेण्यात आली. सदर जुन्या व बंदिस्त इमारतीची आकर्षक रंगरंगोटी करून तिला नवीन पोलीस चौकीचे स्वरूप देण्यात आले. या नवीन चौकीच्या प्रारंभा प्रसंगी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ व पोलीस अधिकारी उपस्थित होते. प्राथमिक स्वरूपात ही चौकी सुरू झाल्यामुळे आता स्थानिक पातळीवरच नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे सुलभ होणार आहे.

तळेगाव बिट कार्यालयाचा शुभारंभ (दि. १३ नोव्हेंबर २०२६):

आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गतच तळेगाव बिट करीता तळेगाव ग्रामपंचायत सचिव यांच्याशी संपर्क साधून बिट चौकीकरिता स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात आली. या खोलीची योग्य ती रंगरंगोटी व दुरुस्ती करून ती पूर्णपणे तयार करण्यात आली. आज या नवीन चौकीच्या प्रचाराकरिता व लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मा. डॉ. वंदना कारखेले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते या चौकीचे व बिट कार्यालयाचे प्राथमिक स्वरूपात औपचारिक उद्घाटन व शुभारंभ करण्यात आला. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरणः

ग्रामीण भागातील जनतेला आणि विशेषतः शेतकरी, महिला व युवकांना छोट्या-मोठ्या तक्रारी किंवा कायदेशीर मदतीसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून बिट प्रणालीला बळकट करण्याचे काम सुरू आहे. कानगाव आणि तळेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या या बिट कार्यालयांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ होईल तसेच परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होईल,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये