
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमूद घटना ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी हे अवैधरित्या मोहा फुलाची भट्टी लावून दारू गाळत आहे अशी माहिती मिळाल्यावरून फिर्यादी व पोस्टफ पंच असे मौजा दहेगाव मुस्तफा येथील आंबेजरी शिवारातील तलावाजवळ गेले असता वरील नमूद आरोपी हे अवैधरित्या मोहा फुलाची भट्टी लावून दारू गाळतांनी मिळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून अंदाजे 40 लिटर मोहफुलाची दारू, 3200 लिटर मोहासडवा पास व मोहाफुलाची दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण किंमती 7,02,350/-रू. चा मुद्देमाल जप्त केला अशा फिर्यादी यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कलम 65(b), (c),(e),(f) म. दा.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात आहे.



