सावली पोलीस स्टेशन तर्फे विश्वशांती विद्यालयात जनजागृती
सायबर फसवणूक,यूपीआय स्कॅम,बद्दल मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट,ऑनलाईन व्यवहार, आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढत असताना सायबर फसवणुकीच्या घटनांपासून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन सावली यांच्या वतीने विश्वशांती विद्यालय सावली येथे सायबर फ्रॉड,यूपीआय कॅम्प याबद्दल जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश झोडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस उपनिरीक्षक नितीन देऊरकर ,प्रमुख अतिथी प्रशांत बंडेवार पोलीस शिपाई,प्रशांत जाधव पोलीस शिपाई,विद्यालयाचे शिक्षक भुजंगराव आभारे उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक नितीन देऊरकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देत ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देण्यात आली.आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे मात्र याच माध्यमाचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर येतात. त्यामुळे विद्यार्थ्यासह नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शालेय वयातच विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराची माहिती मिळणे आवश्यक आहे सोशल मीडिया वापरताना वैयक्तिक माहीती अनोळखी व्यक्तीशी शेअर न करणे,संशयास्पद संदेशापासून दूर राहणे आणि ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीची लक्षणे ओळखणे याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार विद्यालयाचे शिक्षक धनंजय गुरनुले यांनी मानले.आयोजित कार्यक्रमाला शालेय विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.



