ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर पेपर मिल द्वारे कामगार दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त बीजीपीपीएल युनिट बल्लारपूर येथे कामगार महोत्सवच्या निमित्त रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बीपीएम कलामंदिरच्या खुल्या नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात बिल्ट कार्मिक विभागाचे महाव्यवस्थापक प्रवीण शंकर, बीपीएम मजदूर सभेचे सरचिटणीस वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्य गीताने झाली. महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. तसेच मिल मधील कार्यरत चार कामगारांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. तत्पूर्वी एका चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले.प्रमुख पाहुण्यांनी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी सादर केलेल्या नृत्य, गीतगायन आदी रंगारंग कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले. समिती सदस्य अनिल तुंगीडवार यांनी प्रस्तावात उत्सवाची भूमिका मांडली.

महोत्सवांतर्गत विविध उपक्रमांच्या यशस्वितेसाठी समिती सदस्य सर्वश्री सुदर्शन पुल्ली, उमेश कोलावार,अविनाश मेश्राम, विकास पेटकर, बाबुराव जुमनाके, संदीप मिश्रा, सुमेध शेडे, जितेंद्र जैन, रवी गडमवार, राजेंद्र शुक्ला, अजय रेड्डी, कमलेश गेडाम, रोशन गावडे आदींनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास मासे यांनी केले तर सुनील बावणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समिती सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये