ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथे 18 फेब्रुवारीला खावातीन ए इस्लाम या महिला संघटनेद्वारे मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाह सोहळा  

21 जोडप्याचा होणार सामूहिक विवाह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

चंद्रपूर येथे मुस्लिम महिला संघटन खवातीन ए इस्लाम या महिला संघटने कडून मागील सहा वर्षा पासून या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून हे सहावे वर्ष आहे या संघटनेने फक्त विवाह सोहळाच पार पाडला नसून असे अनेक सामाजिक कार्य केले आहे.त्यात मुस्लिम गरजू महिला साठी पापड उद्योग ,गरजू मुलांना शाळे ची फी,मुलांना सायकल वाटप, आवश्यक,वस्तू,बोरिंग व्यवस्था,गरजू रुग्णांना आर्थिक मदत, अशी अनेक कामे या संघटने ने केली असून याचे मुख्य सुत्रधार संघटनेची अध्यक्ष शाहीन शेख असून त्याच्या पुढाकाराने सर्व कामे यशस्वी रीतीने केली जात आहे.

यासाठी त्यांना समाजा सोबत अन्य पक्षाचा,अन्य संघटनेचा पाठींबा सुद्धा मिळत आहे. व मिळत राहल्यास निरंतर अशी समाज उपयोगी कामे करण्याची इच्छा त्यांनी मुलाखती दरम्यान व्यक्त केली. या विवाह सोहळ्या निमित्त त्यांनी प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये