Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी मेघे ग्रामपंचायत येथे समाज भवनाचे भूमिपूजन पार पडले

डॉ.अभ्युदय मेघे यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सावंगी मेघे यांच्या सीएसआर निधी अंतर्गत सावंगी मेघे ग्रामपंचायत वाड नंबर एक परिसरात प्रशिक्षण केंद्र तथा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे तसेच मीनाक्षी जिंदे सरपंच सावंगी मेघे, विलास दोड उपसरपंच, सरिता दोड माजी सरपंच, रेखा चौधरी ग्रामपंचायत सदस्य, सुरेखा चौधरी,दुर्गाताई नौकरकार, सारिका पाटील,वंदना पाटील,दिपाली झोड,शुभांगी पाटील,पुंडलिक सुडीत,प्राध्यापक पद्माकर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वॉर्ड नंबर परिसरात असलेल्या जागेवर प्रशिक्षण केंद्र तथा सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पार पडले.

यावेळी बोलताना मेघे म्हणाले, सावंगी मेघे परिसरात आमचे सर्वात मोठे रुग्णालय असल्याने या गावाचे मोठे ऋण आमच्यावर आहे. त्यामुळे आमचा देखील या गावाप्रती खारीचा वाटा असावा म्हणून म्हणून आम्ही आमची जबाबदारी समजून हा उपक्रम हाती घेतला. सावंगी परिसरातील नागरिकांची आरोग्याची काळजी रुग्णालयाच्या वतीने आम्ही नेहमीच घेत असतो यापुढे देखील घेईल. यावेळी मीनाक्षी जिंदे यांनी या प्रशिक्षण केंद्राला लागणारा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल रुग्णालय प्रशासनाचे गावकऱ्यांच्या वतीने तसेच संपूर्ण सदस्य मंडळीच्या वतीने आभार मानले.

यावेळी अंकित दौड,राजकुमार चौकस्कर, भूषण डाफे,अनिल राऊत, राजू दांदडे, पठाण, राजू राजुकर, प्रवीण नरड, अनिल आंबुलकर, बबलू ढोणे, जुंगडे, विना बोरले, संगीता भोयर ,संगीता चौधरी, मंदा राऊत, मंदा बोबडे, वैशाली नरड, रोशन साखरकर अजय विश्वकर्मा, बाबाराव पेठकर,राजेंद्र मेंडुले, प्रवीण वाघमारे, प्रशांत अँकर, डॉ. प्रदीप चौधरीअंकुश स्वामी यांची प्रमुख उपस्थित होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये