Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीचा १० लाख २४ हजार ३०० रू.चा गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

गुन्हयाची थोडक्यात हकिगत या प्रमाणे आहे की नमुद घटना ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी गोपाल रामचंद्र यादव वय ५० वर्ष रा. घारपुरे ले आउट सिंदी मेघे, वर्धा यांच्या घरातुन अज्ञात इसमाने लोखंडी कपाटातील नगदी १०,०००/- रू. बॉक्स चे दिवाण मधील सोनार मनोहर तुकाराम ढोमणे यांचे नावाचे प्लास्टीक डळ्या मध्ये ठेवलेले १) सोन्याच्या बांगड्या २ नग ३५ ग्रॅम किं.अं. १,०५,०००/- रू. २) सोन्याची बादामी अंगठी २ नग प्रत्येकी ५ ग्रॅम एकुण १० ग्रॅम किं.अं. ३०,०००/- रू. ३) सोन्याचा गोप २० ग्रॅम किं.अं. ६०,०००/- रू. ४) सोन्याचा गोप २५ ग्रॅम किं.अं.७५,०००/- रू.५) सोन्याचा गोप १० ग्रॅम किं.अं.३०,०००/- रू.६) सोन्याचा पुष्पहार २५ ग्रॅम १०० मिली किं.अं. ७५,३००/- रू.७) सोन्याची रिंग अंगठी ३ ग्रॅम किं.अं. ९,०००/- रू.८) सोन्याची कंठी पोत ३५ ग्रॅम किं.अं. १,०५,०००/- रू. ९) सोन्याची चैन पोत २५ ग्रॅम किं. अं.७५,०००/- रू. १०) सोन्याचे मंगळसुत्र पोत १० ग्रॅम किंमत अंदाजे ३०,०००/-रू.११) नगदी, ४,३०,०००/-रू. असा एकुण १०,२४,३००/- रू. मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट अप क.०८९/२०२४ कलम ३८० भा.द.वि.वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला

सदर गुन्हयातील तपास पोउपनी अलीम शेख व गुन्हे प्रकटीकरण पथकातील दिनेश कांबळे, धर्मेद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते, सर्व नेमनुक पोलीस स्टेशन रामनगर, ता.जि. वर्धा यांनी तपासात फिर्यादीचे परीवारातील सदस्याचे कसुन चौकशी केली असता व गुप्त माहीती वरून फिर्यादीचा मुलगा नामे १) यश गोपाल यादव वय २० वर्ष रा.घारपुरे ले आउट सिंदी मेघे, वर्धा. यांचे वर दाट संशय असल्याने चोरी गेलेले नगदी पैसे व सोन्याचे दागीन्या बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केला व काही दिवसा पुवी नगदी पैसे व सोन्याचे दागीने त्याचा मित्र नामे सारंग बंडुजी घरजाळे वय २४ वर्ष रा. हिवरा ता. मौदा जि. नागपूर यांचे कडे ठेवले आहे यांना सदर गुन्हयात विचारपुस करुन आरोपीकडुन सदर गुन्हयात चोरी गेलेला वरील वर्णनाचा सोन्याचे दागीने व नगदी, ४,३०,०००/-रू.असा एकुण १०,२४,३००/- रू.मुददेमाल जप्त करण्यात आला सदरचा गुन्हा उघकीस आनला आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री नुरूल हसन सा, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे सा, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मक्केश्वर सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक श्री महेश चव्हाण यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोउपनी अलीम शेख, दिनेश कांबळे, धर्मेंद्र अकाली, अजय अनंतवार, गणेश सातपुते, सर्व नेमनुक पोलीस स्टेशन रामनगर, ता.जि. वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये