Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यात ५० कोटी विकासकामांचे थाटात भूमिपूजन

आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नाचे फलित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

     विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा यांचे विशेष प्रयत्नातुन सावली तालुक्यातील ५० कोटी रुपयांच्या विकास कामांचा भुमीपूजन सोहळा आज मोठ्या थाटात सावली येथे पार पडला.

    सावली येथे ग्रामीण रुग्णालय इमारत व कर्मचारी निवासस्थानाचे बजेट अंतर्गत बांधकाम करणे,कामाची किंमत ३६.०० कोटी रुपये तसेच नाबार्ड योजने अंतर्गत सावली ते चारगांव रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे.कामाची किंमत ८.०० कोटी,सावली येथे नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सहाय्य योजने अंतर्गत नगरपंचायत इमारतीचे बांधकाम करणे.कामाची किंमत ५.०० कोटी,सावली येथे महात्मा जोतीराव फुले उद्यानाचे बांधकाम करणे,कामाची किंमत १.०४ कोटी रूपये एकूण ५० कोटी रुपयांचे विकास कामाचे भूमिपूजन राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.

        यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार ,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,माजी सभापती विजय कोरेवार,उपसभापती राकेश गड्डमवार,सावली शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार,नगराध्यक्षा लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,युवक अध्यक्ष किशोर कारडे,युवा अध्यक्ष अमर कोनपत्तीवार,महिला अध्यक्षा भारती चौधरी, साधना वाढई,अंतबोध बोरकर,ज्योती शिंदे तसेच सर्व काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्तागण,महिला आघाडी, नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये