ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र सुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आजच्या नव्या युगात कॉम्प्युटर चे ज्ञान हे प्रत्येक व्यक्तीला असणे गरजेचे आहे, त्यात महाराष्ट्र राज्यात MS-CIT कॉम्पुटर कोर्स ला विशेष महत्व आहे हे लक्षात घेता, अल्ट्राटेक, माणिकगड ने आपल्या सी. एस. आर अंतर्गत कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्राची स्थापना केलीत, या केंद्राचे उदघाटन माणिकगडचे एच. आर. उपाध्यक्ष श्री मुकेश गहलोत, माईन्स उपाध्यक्ष श्री संतोष कुमार तिवारी, श्री अमित पाठक, श्री सुनील आलेवार, सॅक्सेना जी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कॉम्प्युटर प्रशिक्षनातं MS-CIT कॉम्पुटर चे ज्ञान मुलांना देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षनाला एकूण लिंगणडोह, नोकारी, गोवारीगुडा व बांबेझरी या गांवातील एकूण 14 मुले व मुली यानी प्रवेश घेतला. यातील सर्व मुलांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून तीन महिने हे प्रशिक्षण देण्यात येणार असून रोज 2 तास होणार आहेत. या प्रशिक्षणाला नोकारी गावातील महिला प्रशिक्षक म्हणून घेण्यात आलि आहेत व त्यांना एक रोजगार मिळवून दिला आहे.मुलांमध्ये कॉम्प्युटर ची आवड निर्माण झाल्यास जवळपास च्या गांवातील मुलांना हे प्रशिक्षण जोमाने देण्यात येईल असे प्रतिपादन श्री मुकेश गहलोत यांनी केलेत तर संतोष कुमार तिवारी यांनी सर्व मुलांना पुढील वाटचालीश शुभेच्छा दिल्यात.

या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता ई. आर. हेड श्री नवीन कौशिक यांच्या मार्गदर्शनात माणिकगडच्या एच. आर., आई. टी. व माईन्स विभागाने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये