ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन करा – पुलकित सिंग

eGramSwaraj पोर्टलवर माहिती भरण्याची प्रक्रिया ; 2 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-II अंतर्गत ‘स्वच्छ सेवा आकलन’ (Swachh Seva Assessment–SSA) उपक्रम राबविण्यात येत असून, ODF Plus (Model) ग्रामपंचायतींच्या स्वच्छता व्यवस्थेचे वार्षिक डिजिटल स्वयं-मूल्यांकन करण्यात येणार आहे. ग्रामीण स्वच्छता सेवांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांना बळकटी देणे हा या आकलनाचा प्रमुख उद्देश असुन जिल्ह्यतील ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावाचे स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

स्वच्छ सेवा आकलनामध्ये ODF स्थितीची शाश्वतता, घन व द्रवकचरा व्यवस्थापन, दृश्य स्वच्छता, SLWM साधनांचे कार्यान्वयन व देखभाल तसेच सामुदायिक स्वच्छता संकुलांचे कार्यान्वयन व देखभाल या प्रमुख बाबींचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. हे आकलन ग्रामपाणी व स्वच्छता समिती (VWSC) तसेच स्थानिक समुदायाच्या सहभागातून प्रमाणित प्रश्नावलीच्या आधारे करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींची महत्त्वाची भूमिका

SSA प्रक्रियेत ग्रामपंचायत सचिवांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या Login मधून eGramSwaraj पोर्टलवर ODF Plus (Model) ग्रामपंचायतीची प्रारूप माहिती भरायची आहे. त्यानंतर ही माहिती ग्रामसभेसमोर चर्चेसाठी व पडताळणीसाठी सादर करून आवश्यक ठरावाद्वारे मान्यता घेण्यात येणार आहे. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती पोर्टलवर सादर करावी लागणार आहे.

2 ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

स्वच्छ सेवा आकलनाच्या तिसऱ्या टप्प्यात 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन करण्यात येणार आहे. प्रारूप अहवाल तयार करून 2 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे. ग्रामसभेतील चर्चेनंतर अंतिम माहिती सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील संबंधित ODF Plus (Model) ग्रामपंचायतींनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता व्यवस्थेची वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून देणे, आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करणे आणि निर्धारित कालमर्यादेत स्वयं-मूल्यांकन पूर्ण करणे अपेक्षित आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनच्या मार्गदर्शनानुसार 25 सप्टेंबर 2026 पर्यंत ODF Plus (Model) ग्रामपंचायतींच्या SSA स्वयं-मूल्यांकनास सुरुवात, 2 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभा, 26 ऑक्टोबरपर्यंत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता आणि 30 ऑक्टोबरपर्यंत eGramSwaraj पोर्टलवरील माहिती सुधारित करून अंतिम करण्याबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. स्वच्छ सेवा आकलनातून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे ग्रामपंचायत स्तरावरील त्रुटी व कमतरता ओळखून कालबद्ध सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार असून, पुढील GPDP चक्रातील नियोजनासाठीही या निष्कर्षांचा उपयोग केला जाणार आहे. जिल्ह्यतील ग्रामपंचायत अधिकारी यांनी गावाचे स्वच्छ सेवा आकलन’ अंतर्गत ग्रामपंचायतींचे स्वयं-मूल्यांकन वेळेत पुर्ण करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग व जलजिवन मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये