ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरातील सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद

नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा शहरातील सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता रुपेश मंकीवार यांनी पोंभुर्णा शहरातील नागरिकांच्या वतीने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.

निवेदनात सामान्य रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व बंद पथदिवे तात्काळ दुरुस्त करून सुरू करावेत, तसेच संपूर्ण मार्गावर पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळी रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अंधारामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाला तातडीच्या सूचना देऊन ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी विनंती रुपेश मंकीवार यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये