डॉ. ज्ञानेश हटवार गुरुरत्न प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शिक्षण संस्था भद्रातील द्वारासंचारित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे कार्यरत असलेले प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि विद्यार्थी हिताच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग नागपूर यांच्यावतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरीय गुरुरत्न शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व संघटनात्मक क्षेत्रात काम करीत असलेले डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या प्रत्यक्ष मुलाखती द्वारे विविधांगी कार्याचा आढावा घेऊन त्यांना गुरुरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, शिक्षणाधिकारी रमेश हरडे, मनोज कुंभारे, हरीश अरोरा, भाग्यश्री पवार, डॉ शरद देशमुख, मोटिवेशनल स्पीकर अजय अग्रवाल दिल्ली, अनिल अहिरकर, डॉ स्मिता वंजारी, डॉ पितांबर ऊरकुडे, अनिल शिवनकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यभरातील २०० शिक्षकांच्या प्रस्तावामधून जीवनगौरव, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, खाजगी अनुदान शाळा, विनाअनुदानित शाळा, कला, क्रीडा, अपंग या विविध संवर्गामधून फक्त ३० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार भद्रावती यांना अनुदानित माध्यमिक विद्यालय या संवर्गातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू व मानाचा शेला देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.



