जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्या मार्फत दि. 1ऑगस्त महसूल सप्ताह साजरा
सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करा - जिल्हाधिकारी वर्धा राहुल कर्डिले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महसूल सप्ताहाचा महसूल सप्ताह सांगता समारंभ आयोजन करण्यात आले
विकास भवन येथे महसूल दिन कार्यक्रम ; महसूल सप्ताहाचा समारोप
उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन व एक रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले
महसूल विभागाला फार जुनी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार कामकाजाच्या स्वरूपात नवीन बदल होत असून ते प्रत्येकाने स्विकारले पाहीजे. महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी हा महसूल विभागाचा कणा आहे. निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन व इतरही कामांमध्ये हा विभाग नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकूण कामाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचे काम करा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम विकास भवन येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे जिल्हा परिषद वर्धा पोलिस अधीक्षक नूरुल हसन, वर्धा अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले वर्धा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे वर्धा उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रियंका पवार कर्डिले वर्धा यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी दिपक करंडे तहसीलदार रमेश कोळपे व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने शासकीय योजनांचा लाभ दुर्गम भागात जाऊन देण्याची मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहीम, पोलिस पाटील, कोतवाल भरती, अनुकंपा भरती व इतरही कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती किंवा आस्थापना विषयक बाबीं सोडविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.
यावेळी उत्कृष्ट अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे तहसीलदार रमेश कोळपे तहसीलदार सचिन कुमावत नायब तहसीलदार श्रीमती सुजाता उईके नायब तहसीलदार राजेंद्र सयाम नायब तहसीलदार कुमारी बाळूताई भागवत नायब तहसीलदार उदय पुंडलिक उच्चश्रेणी लघुलेखक हरीष हाडके लघुलेखक ओंकार आमटे अव्वल कारकून मनिष धानोरकर विवेक मलकापुरे चेतन खंडारे अमोल आगलावे मंडळ अधिकारी ओमप्रकाश बाळस्कर शाम चंदनखेडे रवि अंजारे तलाठी गुणवंत कारमोरे अमोल शंभरकर कुमारी सृष्टी बत्रा श्रीमती उषा मरापे महसूल सहायक श्रीमती सारीका पायघन श्रीमती विनिता राठोड अविनाश मानकर श्रीमती नाजूका तिमांडे कुमारी तेजस्विनी चरडे पोलिस पाटील चंद्रकांत गाखरे प्रमोद महाजन कोतवाल ज्ञानेश्वर चव्हाण ई.पी.शेख सुनील इवनाथे वाहन चालक अनंत गंधे संतोष जाधव शिपाई प्रफुल्ल भोंगे प्रमोद पांडे जनार्दन तराळे श्रीमती दुर्गा गळहाट यानंतर जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे सर्व तहसीलदार यांना स्कॅनर व कॉम्प्युटर वितरण करण्यात आले आणि मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना मातीच्या तनत्यांचे वितरण जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते भेट देऊन गौरविण्यात आले यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार (निवडणूक) अतुल रासपायले यांनी केले तर उपस्थितांचे आभार वर्ध्याचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी मानले.