ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिपरीत आज विविध तपासण्यांसह आरोग्य शिबिर

प्रधानमंत्री आवास योजनेची नोंदणीही मोफत ; संविधान प्रास्ताविकेच्या फ्रेमचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

नगरपंचायत गोंडपिपरी आणि श्रीराम सेना गणेश उत्सव व्यापारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी आज (बुधवार, १७ सप्टेंबर) रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गांधी चौक, गोंडपिपरी येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.

या आरोग्य शिबिरात नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये रक्तदाब (BP), रक्तातील साखर (Sugar), तोंडाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) तपासणी, तसेच स्त्रीरोगविषयक सल्ला व तपासणी करण्यात येणार आहे.

याशिवाय लॅब तपासणी, हिमोग्लोबिन, लिपिड प्रोफाइल, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि थायरॉईड टेस्ट अशा विविध वैद्यकीय तपासण्यांची सुविधाही शिबिरात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्यविषयक तपासणी करून घेण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

गोंडपिपरी शहरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी, शासकीय योजनेची नोंदणी, स्वच्छतेचा संदेश आणि संविधान जागृती अशा विविध उपक्रमांचा संगम या कार्यक्रमातून साधला जाणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी व उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर पंचायत गोंडपिपरी व श्रीराम सेना गणेश उत्सव व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

*प्रधानमंत्री आवास योजनेची नोंदणीही*

आरोग्य शिबिरासोबतच प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सहभागी लाभार्थ्यांना मोफत डस्टबिन/कचरापेटीचे वितरण करण्यात येणार आहे.

*संविधान प्रास्ताविकेच्या फ्रेमचे वितरण*

कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या फ्रेमचे वितरण करण्यात येणार असून, नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये