ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव व आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाबाबत वर्धा पोलिसांचा कडक पवित्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार वि दर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दि. ११.०९.२०२६ ते ०१.११.२०२६ या कालावधीत ध्वनी प्रदूषण नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा पोलिसांकडून गणेशोत्सव तसेच आगामी धार्मिक व सामाजिक उत्सवांच्या कालावधीत ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

मा. न्यायालयाच्या आदेशात DJ Sound Systems, Plasma Sound Systems, Pressure-Mid Sound Systems तसेच अशा ध्वनी यंत्रणा वाहून नेण्यासाठी करण्यात आलेल्या modified vehicles यांच्या वापराबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश अधोरेखित करण्यात आले आहेत.

वर्धा जिल्हा पोलिसांकडून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे :

१. ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळे, आयोजक, DJ चालक व मालक यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

२. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनीक्षेपण करणाऱ्या ध्वनी यंत्रणांची ध्वनी पातळी तपासण्यात येईल व उल्लंघन आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.

३. DJ, Plasma Sound, Pressure-Mid Sound व तत्सम बहुस्पीकर यंत्रणांचा अनधिकृत अथवा नियमबाह्य वापर होणार नाही, यासाठी विशेष पथकांमार्फत तपासणी करण्यात येईल.

४. उत्सव मंडळांना दिलेल्या परवानगी व आदेशातील ध्वनी प्रदूषणासंदर्भातील अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील.

५. शांतता क्षेत्रातील ध्वनी प्रदूषणाबाबत विशेष दक्षता घेण्यात येईल.

६. ध्वनी प्रदूषणाबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

७. मा. जिल्हाधीकारी तथा जिल्हा दंडाधीकारी वर्धा यांनी BNSS च्या कलम १६३ अन्वये असलेल्या अधीकाराचा वापर करून लेझर लॉईट न वापरण्या बाबत अधीसूचना जारी केली आहे

८. मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी कलम ३६ व कलम ३८ (१) महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये असलेल्या अधीकाराचा वापर करून ध्वनी प्रदूषणाबाबत आदेश जारी केला आहे. केवळ आदेश काढणे हा उद्देश नसून आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व प्रभावी पालन सुनिश्चित करणे, हा वर्धा पोलिसांचा प्रमुख उद्देश राहील. मा. न्यायालयानेही केवळ अधिसूचना काढणे पुरेसे नसून तिचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.

वर्धा पोलिसांचे आवाहन

गणेशोत्सव हा वर्धा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव आहे. उत्सवाचा आनंद, उत्साह व परंपरा अबाधित ठेवताना ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची प्रत्येक मंडळ व आयोजकांनी जबाबदारी घ्यावी.

उत्सव उत्साहात साजरा करा; मात्र ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करूनये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये