ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंतराळालाही पाझर फुटेल अशी दुर्दैवी घटना

शेतात पिकांचे संरक्षणसाठी कुंपण टाकताना विजेचा जिवंत तार तूटुन कुंपनावर पडल्याने ३२ वर्षीय जावयाचा जागीच बळी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू तालुक्यातील हिंगणी येथील घटना 

कुटुंबाच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेणाऱ्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या एका दुर्दैवी घटनेत, सासराच्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तार टाकण्याचे काम करत असलेल्या ३२ वर्षीय जावयाचा महावितरणच्या जिवंत वीज वाहिनीची तार अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.

हिंगणी येथील शेतकरी चंद्रभानजी मुडे यांच्या जुनेवाणी मौजातील शेतात आज, रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

महेश टापरे (वय ३२, रा. हिंगणी) असे मृत जावयाचे नाव आहे.

आज दि.१३ सप्टेंबर रविवार चे दुपारची वेळ होती. तेव्हा चंद्रभानजी मुडे यांच्या शेतात कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. याच वेळी त्यांचा जावई महेश टापरे हे शेतातील पिकांना जनावरांपासून संरक्षण मिळावे म्हणून कुंपणाच्या तारा व्यवस्थित करण्याचे व जोडण्याचे काम करीत होते. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच, अचानक शेतावरून गेलेली महावितरणची मुख्य उच्च दाबाची वीज वाहिनीची मुख्य तार तुटली. ही तुटलेली तार दुर्दैवाने थेट खाली पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या लोखंडी तारांवर जाऊन पडली.

महेश टापरे यांच्या हातात ती तार असल्यामुळे त्यांना क्षणार्धात महावितरणच्या विजेचा तीव्र धक्का बसला. डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण प्रकारामुळे शेतात उपस्थित असलेल्या परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने महावितरण विभागाला फोन करून वीज प्रवाह बंद करण्याची विनंती केली. मात्र,

 वीज प्रवाह बंद होतपर्यंत खूप उशीर झाला असल्याने महेश यांना उपचाराची संधीही मिळाली नाही.तीव्र विद्युत प्रवाहामुळे त्यांचा जागीच करुण अंत झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच हिंगणीचे पोलीस पाटील मारुती चचाने यांनी तत्परता दाखवत तात्काळ सेलू पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सेलू पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघोडे यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी उपनिरीक्षक धनंजय पांडे आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले. तसेच महावितरणचे अभियंता वाटकर हे देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास सेलू पोलिसांकडून सुरू आहे.

एका हसत्याखेळत्या तरुणाच्या अकाळी मृत्यूने हिंगणी परिसरात आणि मुडे-टापरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.*शहर प्रतिनिधी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये