ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माझे गाव आरोग्य संपन्न गाव योजनेत नागरिकांच्या आरोग्यविषयक चाचण्या

(शहरी आरोग्य वर्धिकी केंद्र त्रंबक नगरचा उपक्रम)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान आणि तीशीचा पल्ला तपासणी अन सल्ला अभियान अंतर्गत आज शहरातील श्री मारुती संस्थान मंदिर पिंपळनेर परिसरात 150 रुग्णांची रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली तर अनेक रुग्णांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये तीस वर्षावरील व्यक्तींची असंसर्गजन्य व्याधी म्हणजेच रक्तदाब व मधुमेह कर्करोग तपासणी मुख रोग तपासणी,व सल्ला व मोफत औषधी चे वाटप करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रणजीत मंडाले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सदानंद बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदीर आरोग्य परम धनम नागरी आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंगेश पवार स्टाफ नर्स सुरेखा डुकरे आरोग्य सेवक योगेश जगताप परिचर शिवराज कुलकर्णी व सविता नरोडे यांनी या शिबिरात उपस्थित सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात रुग्णांना जास्तीत जास्त सोयी सुविधा या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात या केंद्राचे वतीने शहरातील विविध भागात नियमितपणे रुग्णांची तपासणी करण्यात यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये