महावितरणच्याइमर्जन्सी लोडशेळींग मुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजाचा पोळा बैलांचा सण अंधारात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अविनाश नागदेवे
एकीकडे शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अशी उपाधी आहे तर दुसरीकडे शेतकरी राजावर ऐन पोळ्याच्या दिवशी खानदेशी च्या वेळी व बैलांना जेवणाचे निमंत्रण देण्याच्या वेळी महावितरणचे इमर्जन्सी लोड शेडिंग आल्यामुळे बैलांचा पोळा सण अंधारात करावा लागत आहे.
महावितरणने मोठा वाजा गाजा करून शेतातील शेतकऱ्यांच्या बैलांच्या व गुरांच्या गोठ्यामध्ये सिंगल फेज वीजपुरवठा रात्रभर सुरू राहावा म्हणून स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर म्हणजेच एस डी टी ट्रांसफार्मर 33 केव्ही सब स्टेशन ये लावण्यात आलेले आहे पण एसडीटी ट्रांसफार्मर ची योजना ही केवळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे एसडीटी ट्रान्सफॉर्मर असून सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंगल फेज लाईन सुरू राहत नाही तसेच शेतकऱ्यांना जंगली प्राणी साप विंचू वाघ जंगली डुक्कर अशा प्राण्यांसोबत सामन्या सुद्धा करण्याची वेळ आलेली आहे परंतु जिकडे तिकडे अंधाराचे साम्राज्य घेऊन शेतकरी जगाचा पोशिंदा जगत आहे केलेच शेतकरी आसमानी व सुलतानी संकटातून जात आहे.
अशा या संकटात महावितरणचे इमर्जन्सी लोड शेडिंग सुद्धा कारणीभूत ठरत आहे आज पोळ्याचा पहिला दिवस असून बैलांची पूजा अर्चना करून त्यांना खांद शेकणीचा कार्यक्रम तसेच जेवणाचे आमंत्रण निमंत्रण देण्याचा कार्यक्रम असते सर्व शेतकरी आपापल्या शेतात बैलांना गोठ्यात बांधून आमंत्रण देत असतात की आज आवतन घ्या व उद्या जेवायला या पद्धतीने शेतकरी रामराम बैलांना राबवतो व स्वतः सुद्धा शेतामध्ये राबतो वर्षभर केलेल्या कष्टाची कृतज्ञता म्हणून त्यांच्यासाठी हा सण व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून महावितरण कंपनी व महाराष्ट्र शासनास शेतकरी बंधूं कडून अशी विनंती करण्यात येत आहे की शेतकऱ्यांच्या शेतात इमर्जन्सी लोड शेडिंग पासून शेतकऱ्यांना कायमचे मुक्त करून एक फेज लाईन रात्रभर सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून महावितरण ला करण्यात येत आहे
आपलाच शेतकर
किशोर वामनराव मुटे
इंझाळा तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा



