ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नियम मोडाल तर कारवाई अटळ! गणेश मंडळांना कोरपणा पोलिसांचा इशारा

गणेशोत्सव शांततेत व शिस्तीत साजरा करण्याचे ठाणेदारांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरपणा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना शासन व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन कोरपणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार लता वाडीवे यांनी केले आहे.

गणेश मंडळांनी मंडप उभारताना आवश्यक परवानग्या घेणे, ध्वनिक्षेपकाचा मर्यादित व नियमानुसार वापर करणे, मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक आहे.

उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी, अश्लील गाणी, दारूचे सेवन, भांडणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करून शांतता, शिस्त आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन कोरपणा पोलीस स्टेशनचे लता वाडीवे ठाणेदारांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये