ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेतनसिंह गौर यांची सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी_ आमदार देवराव भोंगळे

गोंडपिपरीत पार पडला सामाजिक उपक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

राजकारणात काम करतांना सामाजिक भावना ठेवून काम करणारी माणसं दुर्मिळ झाली आहेत. पन अशातशी आपले स्थान निर्माण करीत वेगळे पणा जपणारे अन समाजाच्या हिताचे काम करतातं. गोंडपिपरी येथील भाजपचे शहराध्यक्ष, नगरपंचायतीचे गटनेते चेतनसिंह गौर यांचे कार्य हे प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा मतदारसंघांचे आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

गोंडपिपरी येथे भाजपचे नेते चेतनसिंह गौर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यनिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी ते बोलत होते.

चेतनसिंह गौर यांनी वाढदिवसाच्या निमित्याने सामाजिक बांधिलकी जोपासत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केल्याने गोंडपिपरी परिसरातील गोरगरीब, गरजू नागरिकांना या रुग्णसेवेचा मोठा लाभ झाला. येणाऱ्या काळात त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो,अशीही सदिच्छा यावेळी मनोगतातून आमदारांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजप नेते विश्वजीत सिंघ चंदेल, भाजपाचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि. प.सदस्य अमर बोडलावार, महामंत्री निलेश संगमवार, निलेश पुलगमकर, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पून, राकेश साकलवार, शिथिल लोणारे, प्रवीण धोडरे, रमेश दिंगलवार, वैभव बोनगिरवार, दिपक बोनगिरवार, अमित वेगिणवार सचिन चिंतावार, मयूर गौर, महिला मोर्चाचे जिल्हा महामंत्री कोमल फरकडे, नगरसेविका शारदा गरपल्लीवार, रंजना रामगिरीकर, सारिका मडावी, स्वाती वडपल्लीवार, अरुणा जांभूळकर, धीरा गौर, वनिता देवगडे, कलावती पूप्पलवार यांचेसह गौर परिवारातील सदस्य, भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये