ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारंजा पोलीस स्टेशनला मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से) यांची भेट

महिला, नागरिक व पोलीस कुटुंबांच्या अडीअडचणी जाणून घेत दिले निराकरणाचे आश्वासन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से) यांनी कारंजा पोलीस स्टेशनला भेट देऊन विविध बैठकांचे आयोजन केले. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील व्यापारी, नागरिक, महिला मंडळ व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.

१. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत विशेष बैठकः

मा. पोलीस अधीक्षक यांनी कारंजा परिसरातील स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबत, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही यंत्रणा आणि चोरी-गुन्हेगारी रोखण्यासंदर्भातील अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांनी परस्परांच्या समन्वयाने काम करावे. असे सांगत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२. नागरिक व महिला मंडळासोबत आढावा बैठकः

भेटीदरम्यान मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक नागरिक व महिला मंडळाची विशेष बैठक घेतली. यामध्ये महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मु‌द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना ‘डायल ११२’ आणि ‘वुमन हेल्पलाईन क्रमांकाबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्याही अडचणीच्या किंवा आपत्कालीन प्रसंगी महिलांनी न घाबरता या क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

३. पोलीस कुटुंबांसोबत संवाद (पोलीस फॅमिली मीटिंग):

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक व निवासी परिसरातील समस्या समजून घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस फैमिली’ बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विविध अडीअडचणी मांडल्या. मा. पोलीस अधीक्षक यांनी सर्वाच्या समस्या आदरपूर्वक ऐकून घेत त्या प्राधान्याने व वेळेत सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले.

प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थितीः या महत्त्वपूर्ण बैठका व कार्यक्रमास खालील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री सौरभ कुमार अग्रवाल मा. पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री राहुल आत्राम (भा.पो.से) उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी उपविभाग, श्री विनोद चौधरी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, श्री देविदास गजरे पोलिस निरीक्षक वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा, श्री प्रल्हाद मदन ठाणेदार, कारंजा पोलीस स्टेशन व इतर पोलीस अंमलदार, स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये