ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि.प.लालगुडा शाळेत “वाचनाचा आनंदोत्सव”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना : निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत कोरपना तालुक्यातील गडचांदूर केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे वाचनाचा आनंदोत्सव यशस्वीपणे राबविण्यात आला.

              जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर तथा शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ वाचनाचा आनंदोत्सव ‘ हा अभिनव उपक्रम शाळेत दिनांक :17 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 पर्यंत उत्साह पूर्ण व शैक्षणिक वातावरणात राबविण्यात आला. या ज्ञानवर्धक उपक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना स्वयंपूर्ण अध्ययना कडे प्रवृत्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.शाळेतील उपक्रमशील शिक्षक गोविंद पेदेवाड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी दररोज कृतीपुस्तिकातील परिच्छेद , कथा , कविता,समाजसुधारक यांची माहिती, संतांची माहिती,संवाद ,प्रसंग , जाहिराती, इत्यादीचे वाचन केले . तसेच प्रत्येक दिवशी त्या वरील सराव प्रश्न व सर्जनशील प्रश्नांची एका स्वतंत्र वहीत उत्तरे लिहून काढली. सदर उपक्रमातील विद्यार्थ्यांच्या वाचनाचे व्हिडिओ विनोबा ऍप वर अपलोड करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा वाचन स्तर निश्चिती करण्यासाठी दैनिक मूल्यमापन सुद्धा करण्यात आले.

            या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची गती वाढली असून त्यांना वाचनामध्ये आवड निर्माण झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये