ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा लोकहितासाठी काम करणारा पक्ष – आमदार देवराव भोंगळे

लखमापूर येथे शेतकरी संघटनेचे नेते मोरेश्वर आस्वले व सरपंच अतुल धोटे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :_ भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय सत्ता मिळविणारा पक्ष नसून तळागाळातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि तरुणांच्या न्याय्य हक्कांसाठी अविरत कार्य करणारा पक्ष आहे. पक्षाची धोरणे ही सर्वसमावेशक विकासाला गती देणारी असून भारतीय जनता पक्ष हाच लोकहिताचे कार्य करणारा प्रमुख पक्ष असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

लखमापूर येथे शेतकरी संघटनेचे नेते मोरेश्वर आस्वले व निमणी येथील सरपंच अतुल धोटे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी (दि.३) भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.

पुढे बोलतांना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामांना गती देण्यात येत आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच भाजपाचे ध्येय असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार देवराव भोंगळे यांनी दिली.

यावेळी भाजपात पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा आमदार देवराव भोंगळे यांनी भाजपा पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात स्वागत केले.

आमदार देवराव भोंगळे यांचा राजुरा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा सुरू असलेला झंझावात आणि त्यांचे कुशल नेतृत्व सर्वसामान्य जनतेला पटले असून आम्ही भाजपात पक्षप्रवेश करीत असल्याची भावना नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, गडचांदुर शहराध्यक्ष अरविंद डोहे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, अरुण रागीट, भाजपाचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, नगरसेवक सतीश बेतावार, हिमांशु नामवाड, प्रफुल कावळे, संगीता गावत्रे, कीर्ती वैरागडे, सपना सेलोकर, नम्रता डुकरे, कवठाळा येथील सरपंच रुपाली बोबडे, अशोक झाडे, संजय नीत, रवी बंडीवार, प्रमोद कोडापे, श्रीकृष्ण गोरे , विशाल पावडे, नरसिंग हामने, दिनेश खडसे, संजय थिपे, ज्ञानेश्वर पानघाटे, आबाजी बोबडे, अविनाश वाभिटकर, सचिन बोंडे, राजू डाखरे, विशाल गज्जलवार, पुरुषोत्तम निब्रड, समशेर शेख, प्रदीप पारखी, निलेश भिवापुरे,अनिल संकुलवार, सुरेश चौधरी, शंकर उरकुडे, दिलीप काकडे, रवींद्र वडस्कर, सुरेश बुऱ्हान, शंकर शेंडे रवींद्र नांदे, मारोती पांढरे, नामदेव येडमे, भाऊराव जुमनाके यांचेसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये