ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल सप्ताहाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेला आहे महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ हा कार्यक्रम तहसील कार्यालय,व र्धामार्फत घेण्यात आला या कार्यक्रमांतर्गत वर्धा तालुक्यातील माजी सैनिक, वीरमाता व वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच माजी सैनिक यांना कार्यक्रमाला बोलवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या अडचणींची निराकरण तात्काळ करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम वर्धा उपविभागीय अधिकारी श्री दीपक करंडे तहसीलदार श्री रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला माधवराव मोहिते, वरिष्ठ माजी सैनिक, बिपिन मोघे, विभागीय उपाध्यक्ष, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना नागपूर विभाग तथा राष्ट्रीय संचालक जयहिंद फाऊंडेशन, राजेंद्र मेघे, अध्यक्ष, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना जिल्हा वर्धा, श्री शंकर गोडे (सेना मेडल), धनंजय सदाफले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वर्धा उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये