Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजय देशमुख ईलनाच्या राष्ट्रीय सचिव पदावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 इंडीयन लॅंग्वेजेस न्यूजपेपर्स असोसिएशन (ईलना) या देशभरातील सर्व भाषिक वृत्तपत्रांच्या राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय सचिव पदावर अकोला येथील विश्वप्रभातचे संपादक तथा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख ( निंबेकर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि.०२ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जुण्या महाराष्ट्र सदनामध्ये झालेल्या कार्यकारिणीच्या सभेत ईलनाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष दै देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांनी ईलनाच्या सुलभ कामकाजासाठी ही नियुक्ती घोषित केली आहे.त्याला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शवून या नव्या बदलांचे स्वागत केले आहे.

संजय देशमुख हे अकोला येथून कोरोना काळात स्थापन झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष असून ते महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे राज्य पदाधिकारी आहेत. मानवधर्म पतसंस्थेच्या माध्यमातून ते २२ वर्षापासून सहकार आणि सामाजिक क्षेत्रात व ४० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत.सध्या त्यांची लोकस्वातंत्र्य ही संघटना सुध्दा महाराष्ट्रभरात पोहचली असून ईतर राज्यात तिचे संघटनकार्य सुरू झालेले आहे.आता ईलना सुध्दा महाराष्ट्र आणि देशभरात मजबूत करण्यासाठी तिला अध्यक्ष म्हणून प्रकाशभाऊ पोहरे यांचे सक्षम नेर्तृत्व लाभले असून त्यांचेसोबत संजय देशमुख यांचेही योगदान ईलनासाठी लाभणार आहे.

दिल्लीत प्रकाशभाऊ पोहरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी अध्यक्ष सुनिलजी डांग,आशुतोषजी पाठक,अरूण भाटिया,(दिल्ली) हे प्रत्यक्ष तर संजय देशमुख,रविकुमार बिष्णोई,अंकित बिष्णोई( मेरठ- राजस्थान) शिवकुमार अग्रवाल(नागपूर ) हे ऑनलाईन सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये