ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ए आय बाबत मार्गदर्शन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या वतीने मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्री सचिन शंभरकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात महत्त्वाची माहिती सांगत विद्यार्थ्यांनी याबाबतचे स्किल शिकून जीवनाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन केले.

     राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी गटनिदेशक राजू श्रीरामे यांनी प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमास प्रविण श्रीकोंडावार , तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी, निदेशक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये