ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सन २०२६-२७ अंतर्गत देऊळगाव राजा येथील बालाजी महाराज मंदिर परिसरात रानभाजी महोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला,या महोत्सवामध्ये विविध रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पौष्टिक गुणधर्म तसेच मानवी आरोग्यास होणारे विविध फायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान कचवे तसेच उप कृषी अधिकारी संदीप डोईफोडे यांनी उपस्थित शेतकरी व नागरिकांना मार्गदर्शन केले. रानभाज्या या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या असून त्यामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे व पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. पारंपरिक आहारातील रानभाज्यांचे महत्त्व जपण्यासोबतच त्यांचा आहारात योग्य पद्धतीने समावेश करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, माजी उपनगराध्यक्ष पवन झोरे, पत्रकार प्रा. अशोक डोईफोडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव मुंडे, डॉ. अशोक काबरा, तसेच सुधाकर राजा मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी सुधाकर कंकाळ, देऊळगाव मही मंडळ कृषी अधिकारी अनंता सरनाईक व कृषी अधिकारी दिलीप वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा महोत्सव उपयुक्त ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये