ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वयोवृद्ध सरस्वती मसुरे यांचे मरणोत्तर नेत्रदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सामाजिक कार्यकर्ते दादा जम्मन व्यवहारे यांच्या भगिनी सरस्वती सोपानराव मसुरे राहणार जालना यांचे वयाच्या 70 व्या वर्षी वृद्धापकाळाने 13 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले.

मृत्यूनंतर त्यांच्या परिवारातील सदस्य राम व शाम मसुरे यांनी त्यांच्या आईचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंट्स परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा व जुगल किशोर हरकुट यांना निधनाची माहिती दिली वरून यांनी जालना येथील गणपती नेत्रालयाचे चमूस बोलावून सरस्वती मसुरे यांचे नेत्रदान प्रक्रिया पूर्ण करून घेतली मृत्यु पश्चात त्यांच्या परिवारात दोन मुले दोन मुली असा परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये