ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कीर्ती कुचेरिया यांचे मरणोत्तर नेत्रदान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगावराजा येथील प्रतिष्ठित व्यापारी गौतम दुगड यांचे नातेवाईक कीर्ती प्रवीण कुमार कुचेरिया राहणार लोणार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यु पश्चा्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला व जायंटस परिवाराचे डॉक्टर अशोक काबरा यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधून जालना येथील गणपती नेत्रालयाच्या यमुने येथे येऊन मरणोत्तर नेत्रदान करून घेतले त्यांच्या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला असून त्या दोन नेत्रामुळे भविष्यात या पृथ्वीतलावरील दोन अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी केवळ या परिवारामुळे मिळणार आहे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.



