प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे दिनांक 19/08/2026 रोजी महाविद्यालयाच्या मैदानी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव तथा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे, प्रा. स्वप्निल डुमोरे, प्रा.स्वप्नील सातपुते,प्रा. विकास दुर्योधन, प्रा.प्रकाश लालसरे, प्रा.गणेश बांगडे, प्रा. रत्नाकर बोभाटे प्राध्यापिका स्मिता देवतळे, नीलिमा बावणे,नीता मुसळे, संगीता बलकी, वैशाली जमदाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात प्राचार्य अनिल मुसळे यांच्या हस्ते विविध फळांच्या व फुलांच्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे इतरही मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.



