ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालय, जिवती येथे त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

या प्रसंगी स्व.वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य तसेच ग्रामीण विकासाला दिलेली चालना याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली.

स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी विकासाला आधुनिक दिशा देत हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. कृषी, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक उन्नतीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मुरलीधर जाधव, प्रा. डॉ. प्रफुल वानखेडे, प्रा. मनोज राठोड, प्रा. मनीष कुमार वाघमारे, अधीक्षक विकास डुकरे, शिक्षकेतर कर्मचारी आकाश गायकवाड, अंबादास गोतावळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये