ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी प्राचार्य एस.आर.रामटेकेंचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रह्मपुरी :_ येथील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तित्व आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथील दीर्घकाळ राहिलेले माजी प्राचार्य डॉ एस.आर. रामटेके यांचे बुधवारी सकाळी ७.३०वा. वयाच्या ऐंशी व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.

   त्यांच्या निधनाची माहिती मिळताच पंचक्रोशीतील सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांनी शोक व्यक्त केला असून प्राचार्य डॉ.रामटेके एक उत्तम प्रशासक,शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्त्व होते.ही पोकळी भरुन निघणे कठिणच!अशा संवेदना व्यक्त केल्या. गुरुवारला सकाळी १०.००वा.त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली,एक मुलगा,नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये