ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

CLTC अभियंता पदभरतीची चौकशी करून नव्याने पारदर्शक भरतीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभुर्णा : पोंभुर्णा नगरपंचायतीतील CLTC अभियंता पदभरतीच्या संदर्भात जिल्ह्याच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांची पोंभुर्णा येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

सदर पदभरती प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून शासनाच्या नियम व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच संपूर्ण पदभरती प्रक्रियेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून, अनियमितता आढळल्यास संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय, विद्यमान पदभरती प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक, निष्पक्ष व नियमानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.

पदभरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा पक्षपात किंवा अनियमितता होऊ नये आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळावा, यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये