दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एच. एस. शाक्या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण रंगवाड सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करून उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाविद्यालय परिसरात तिरंगी पताका व सजावटीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एस. शाक्या यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी लक्ष्मण रंगवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन केले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक जाधव व राठोड वाघमारे शिक्षकेतर कर्मचारी अरविंद मुसने विकास डुकरे आकाश गायकवाड तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.



