ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी उपसरपंच्याचा चंदनखेड्यात अवैध बिअर बार

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई : आरोपीला अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

तालुक्यातील चंदनखेडा येथे हार्डवेअर दुकानाच्या नावाखाली बियर, देशी, विदेशी दारू साठा ठेवून दारू विक्री करून अवैध्य बियर बार चालविणारा चंदनखेडा येथील माजी उपसरपंच्याला अवैध दारू सह अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारला गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर यांनी केली.
डेव्हिड बागेसर माजी उपसरपंच चंदनखेडा असे आरोपीचे नाव आहे आरोपी हे मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी आहे. चंदनखेडा येथील हार्डवेअरच्या दुकानांमध्ये बियर, देशी, विदेशी दारू पॅक पद्धतीने विक्री करत असल्याबाबतची माहिती गुन्हे अन्वेषण विभाग चंद्रपूर यांना मिळाली त्या आधारे ७o हजाराचा दारू साठा जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डेव्हिड बागेसर यांच्यावर अवैध दारू विक्री प्रकरणात भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये बहुतांश गुन्हे दाखल आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये