ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बालाजी हायस्कूलच्या कबड्डी संघाचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना १० ऑगस्टपासून उत्साहात सुरुवात झाली असून, या स्पर्धेत बालाजी हायस्कूल, जिवतीच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करत तब्बल तीन गटांत प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

बालाजी हायस्कूलच्या १४ वर्षे मुले कबड्डी संघाने, तसेच १४ वर्षे मुली कबड्डी संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर १७ वर्षे मुले कबड्डी संघानेही प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सांघिक खेळ, उत्कृष्ट नियोजन, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. तीनही संघांच्या या यशामुळे बालाजी हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजयी विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक तसेच शाळेतील शिक्षकवृंदांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये