ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना शहरात भव्य ‘तिरंगा यात्रा’; भारत माता की जय अन्‌ वंदे मातरम्‌च्या घोषाने परिसर दुमदुमला! तिरंगा रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

​कोरपना :- स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत कोरपना शहरात अत्यंत उत्साही आणि देशभक्तीमय वातावरणात भव्य ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. या यात्रेत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांची विशेष आणि प्रमुख उपस्थिती होती. बसस्थानक चौक परिसरातून निघालेल्या या यात्रेने मुख्य मार्गावरून भ्रमण करत संपूर्ण कोरपना शहराला देशप्रेमाच्या रंगात न्हाऊन काढले.

​मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत असताना या तिरंगा यात्रेचे व्यापारी, महिला आणि स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि वीर हुतात्म्यांच्या जयघोषाने संपूर्ण कोरपना शहर दुमदुमून गेले होते.

​समाजाच्या सर्व घटकांचा अभूतपूर्व सहभाग

​आमदार देवराव दादा भोंगळे यांच्यासोबत या यात्रेत प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, माजी सैनिक, बचत गटाच्या महिला, सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि कोरपना शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​तिरंगा ही आपली अस्मिता आणि एकतेचे प्रतीक- आमदार देवराव भोंगळे

​या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले,

​”आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक थोर, शूर वीर आणि क्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांचे स्मरण करण्याचा आणि राष्ट्राप्रती निष्ठा पुनरुज्जीवित करण्याचा हा पवित्र दिवस आहे. आमचा तिरंगा हा केवळ तीन रंगांचा ध्वज नसून ती प्रत्येक भारतीयाची अस्मिता, एकता आणि अखंडतेचे प्रतीक आहे. ‘समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत’ घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच आपल्या राष्ट्रध्वजाला दिलेली खरी सलामी ठरेल.”

​प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

​या भव्य तिरंगा यात्रेत आमदार देवराव भोंगळे यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार पल्लवी आखरे, नायब तहसीलदार करिष्मा वासेकर, गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, पोलीस निरीक्षक लता वाढीवे, तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांच्यासह प्रमुख प्रशासकीय यंत्रणा उपस्थित होती.

​तसेच भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, शहराध्यक्ष अमोल आसेकर, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, अरुण रागीट, किशोर बावणे, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री आशिष ताजने, नारायण हिवरकर, निखिल भोंगळे, अविनाश वाभीटकर, कार्तिक गोण्लावार, नितेश भिवापूरे, प्रणय अतकरे, अशोक झाडे, शशिकांत आडकीने, विजय रणदिवे, प्रमोद पायघन, जगदीश पिंपळकर, मनोज तुमराम, हितेश चव्हाण, ओम पवार, सागर धुर्वे, दिनेश ढेंगळे, दिनेश खडसे, नैनेश आत्राम, उमेश पालिवार, विशाल गज्जलवार, सुशांत आत्राम, सतीश बेतावार, धमकीर्ती कापसे, सचिन कुळमेथे, सचिन आस्वले, हरिदास बोरकुटे, सुधाकर ताजने, संजय नीत, राहुल पायघन, सतीश जमदाडे, रवी बंडीवार, आशिष देवतळे, साईनाथ तिखट, मोहब्बत खान, पवन बुरेवार, बाळा पावडे, अनिल शेंडे, प्रमोद शेंडे, गणेश पावडे, सचिन भोंगळे, अनिकेत घुगुल, बाळा गाडगे, मंगल खाडे, देविदास आवारी, मन्सूर शेख, राजू नांदेकर, विवेक वडस्कर, विलास पारखी, गजानन बोर्डे, किशोर कुशमवार, घनश्याम ताजने, शंकर पावडे, अमरदीप पिदुरकर, सत्यवान घोटेकर, पुंडलिक उलमाले, सुनील देरकर, विजय पानघाटे, अभय डोहे, संतोष बोर्डे, विनोद कुमरे, गजानन येडे, सुदाम लांडे, सुभाष हरबडे, पंकज पवार, नम्रता ढुकरे, रंजिता धाबेकर, इंदिरा कोल्हे, लता एकरे, गीता डोहे, सोनाली आसेकर, प्रणाली डाखरे, आशा धांडे, अलका रणदिवे, आशा झाडे, सविता तुमराम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये