दीनदयाल विद्यालयात गुणवंतांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा :- दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय, देऊळगाव राजा, येथे इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा मार्च २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाबासाहेब मिनासे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत, विद्यालयाचे स्थानिक सल्लागार त्र्यंबकराव जायभाये, अॅड. घनश्याम भाला, धर्मराज हनुमंते, जुगलकिशोर हरकुट, आनंद काबरा, माजी पर्यवेक्षक रमेश डोईफोडे, माजी लिपिक सतीश कुलकर्णी, प्राचार्य भगवान आरसोडे व पर्यवेक्षक राजेश भिवटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भगवान आरसोडे यांनी केले. सूत्रसंचालन दिवटे व अनिल दंदाले यांनी केलें आभार संतोष खुळे यांनी मानले यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींचे सहकार्य केले



