ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महसूल सप्ताह निमित्य युवा संवाद, विविध स्पर्धा व एक हात मदतीचा तहसिल कार्यालय, वर्धा मार्फत उपक्रम

सदर कार्यक्रमाकरीता 350 विद्यार्थी होते उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 01.08.2023 ते 07.08.2023 पर्यंत महसूल प्रशासनातर्फे महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज दिनांक 03.08.2023 रोजी युवा संवाद या उपक्रमाअंतर्गत तहसिल कार्यालय, वर्धा मार्फत वर्धा तालुक्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बजाज विद्यान महाविद्यालय येथे प्रा. श्री. नितेश कराळे सर यांच्येकडुन स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या वऱ्हाडी शैलीत विद्यार्थ्यांना UPSC, MPSC तसेच इतर विविध स्पर्धा परिक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाकरीता 350 विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

तसेच यशवंत महाविद्यालय, वर्धा येथे युवांमध्ये संभाषण कौशल्य व त्यांचे व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने महसूल विभागामार्फत निवडणूक प्रणालीमध्ये युवकांची भूमीका” या विषयावर वाद-विवाद तसेच “देशाचे जडनघडनेत युवकांची भूमीका” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी आपले विचार कौशल्या दाखविले.

“एक हात मदतीचा”

एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत ग्रामिण 38 व शहर 26 असे एकुण 64 कुटुंबांचा शोध घेऊन राष्ट्रिय कुटुंब अर्थ सहाय्य अंतर्गत रुपये 20000/- प्रमाणे लाभ देण्याची सविस्तर प्रक्रिया राबविण्यात आली. तसेच मा. उपविभागीय अधिकारी, वर्धा श्री. दिपक कारंडे, मा. तहसिलदार, वर्धा श्री. रमेश कोळपे यांनी 6 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्यांना आवश्यक त्या मदतीबाबत आश्वस्त केले.

असे विविध उपयुक्त उपक्रम ज्यामुळे युवकांचे व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांना विविध क्षेत्रात काम करण्यास सक्षम बनविण्याकरीता मा. उपविभागीय अधिकारी, वर्धा श्री. दिपक कारंडे, मा. तहसिलदार, वर्धा श्री. रमेश कोळपे यांचे सौजन्याने वर्धा तालुक्यामध्ये राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व बजाज महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. टेकाडे तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये