ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य

नगरपंचायतचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

ग्रामपंचायत च्या काळापासून विश्वशांती विद्यालयाच्या मागील भागातील पूर्वीचे सिंचन विभाग आणि आताचे गोसेखुर्द विभागाच्या जागेवर आठवडी बाजार भरत असते आठवडी बाजारात ग्रामीण भागातील नागरिक बाजार करण्याकरिता महिला पुरुष मोठ्या संख्येने येतात,तसेच शाळकरी मुले मुले ही बाजारात येतात मुख्य आठवडी बाजारात पावसाळ्यात सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य राहते.

त्यामुळे याच भागातून जात असलेला हरंबा रोडवरच दुकानदार आपली दुकाने लावतात त्यामुळे वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघातीची टांगती तलवार असते दुकानदार रस्त्याच्या बाजूला दुकान थाटत असल्याने नागरिकांना जीवमुठीत घेऊनच खरेदी करावी लागते. नगरपंचायतच्या निर्मितीस नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे परंतु आठवडी बाजारातील पाणी समस्या आणि चिखलाची समस्या दूर करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत आहे,आठवडी बाजाराची जागा गोसेखुर्द विभागाची आणि कंत्राटाची रक्कम नगरपरिषद प्रशासन घेत आहे.

दरवर्षी लाखो रुपये नगरपंचायतला आठवडी बाजाराच्या ठेकेदाराकडून प्राप्त होत असताना देखील सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे आठवडी बाजारातील दुकानदार संबंधित ठेकेदारास दुकानाची चिठ्ठी देण्यास नकार देत असल्याने ठेकेदार आणि दुकानदारांमध्ये नेहमीच वादावादी होत असते त्याचा फटका ठेकेदारात बसत आहे अखेर ठेकेदार नगरपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन मागील महिन्यात दिले आणि मुरूम अथवा चूरी टाकून देण्यात यावी अशी मागणी केली तरीही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही त्यामुळे ठेकेदाराचे हजारो रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे बाजार ठेकाची बोली बोलल्याप्रमाणे रक्कम नगरपंचायत ला द्यावे लागते परंतु आठवडी बाजारात कोणतीच सुविधा करून देत नसल्याने दुकानदार चीठीचे पैसे देण्यास नकार देत असल्याने ठेकेदाराचे आर्थिक नुकसान होत आहे

याशिवाय नागरिकांनाही खरेदी करण्यास प्रचंड मानसिक त्रास होत आहे अनेकदा महिला पुरुषांचे वादविवाद झालेले आहेत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन आठवडी बाजारात चिखल होणार नाही करिता मुरूम किंवा चु री टाकून देण्यात यावी आणि दुकानदार व ग्राहकांना सुविधा द्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये